पंतप्रधान नरेंद्र मोदी सरड्यासारखा रंग बदलत आहेत. त्यांच्या 400 पारच्या नाऱ्यात कोणताही दम नाही, अशी टीका टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारवर निशाणा साधताना केली. महाविकास आघाडीने आम्हाला 2 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. आम्ही पूर्वीपासूनच निवडणुकीची तयारी केली होती, असेही ते यावेळी म्हणाले.