पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरविलेलेचंद्रकांत कुलकर्णी याचे निधन

0
3

आकुर्डी, दि. २६ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी देश के सच्चे हिरो म्हणून ज्यांचा गौरव केला त्या निवृत्त शिक्षक चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी (वय ७५) यांचे आज पहाटे आकुर्डी येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परवार आहे.
आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात राहणारे कुलकर्णी हे खडकी येथील शाळेत शिक्षक होते. निवृत्तीनंतर स्वच्छ भारत अभियानसाठी त्यांनी स्वतःची पेन्शन दिल्याने पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मनकी बात कार्यक्रमात विशेष उल्लेख केला तसेच सन्मान म्हणून अभियालातील विविध तीन कार्यक्रमांसाठी विशेष निमंत्रीत म्हणून पाचारण केले होते. समाजकार्याच्या माध्यमातून स्वच्छता आणि जनजागृतीसाठी उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
२०१६ साली Swachh Bharat Abhiyan अंतर्गत बालेवाडी स्टेडियम येथे त्यांना व्हीआयपी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांना “देश के सच्चे हिरो” हा किताब देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी Narend Modi यांनी त्यांचा विशेष सत्कार करून शौचालय बांधकामासाठी त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.
स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांनी आपले बँक खाते उघडून एक तृतियांश पेन्शनची रक्कम देणगी म्हणून दिली. तसेच महापालिकेला ११ हजार रुपयांची देणगी देत स्वच्छता उपक्रमांना हातभार लावला.
शिक्षण क्षेत्रातही त्यांनी योगदान देत खडकी येथील इंग्लिश मीडियम शाळेसाठी मदत केली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना दिल्ली, गुजरात आणि बालेवाडी येथे व्हीआयपी व्यक्ती म्हणून पाचारण करण्यात आले होते.
याशिवाय उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात १०१ बोअरवेलसाठी त्यांनी देणगी दिली. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथेही त्यांनी सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरविलेले
चंद्रकांत कुलकर्णी याचे निधन