पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणे पार्किंगसाठी अधिग्रहित

0
55

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २६ सप्टेंबर २०२४ रोजीच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या कार्यक्रमास जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक पुणे शहरात येण्याची शक्यता असल्याने २६ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील विविध ठिकाणच्या जागा वाहनांच्या पार्किंगसाठी अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ६५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार पुणे शहरातील नदीपात्र भिडे पूल, पाटील प्लाझा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, हरजीवन हॉस्पीटल सावरकर चौक, पीएमपीएल मैदान पूरम चौक, निलायम टॉकीज, विमलाताई गरवारे शाळा, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कटारिया माध्यमिक शाळा, मिनर्व्हा पार्किंग मंडई व हमालवाडा पार्किंग या ठिकाणच्या जागा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.