पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला महिलांच्या खात्यात १० हजार

0
56

दि. १७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्याचे औचित्य साधून महिलांसाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेत महिल्यांच्या खात्यात पाच हजार रुपये येणार आहे. वर्षभरात एकूण दहा हजार रुपये महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेचे नाव सुभद्रा योजना आहे. ओडिशा सरकारने ही योजना आणली आहे.

काय आहे योजना

सुभद्रा योजना सरकारची योजना आहे. या योजनेत राज्यातील 21 ते 60 वर्ष वय असलेल्या महिलांना दरवर्षी 10,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेची सुरुवात केली. योजनेला नाव भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावरुन दिले आहे.
दोन टप्प्यात मिळणार 10,000 रुपये

ओडिशा सरकार राज्यातील महिलांच्या खात्यात दोन टप्प्यात 10 हजार रुपये देणार आहे. ही योजना पाच वर्षांसाठी म्हणेज 2028-29 पर्यंत असणार आहे. योजनेचा एक हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनी तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 55,825 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या पैशांच्या माध्यमातून महिला आपला व्यवसाय सुरु करु शकतात.