पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देहू दौरा; आंदोलनाच्या तयारीत असलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर पोलिसांच्या ताब्यात

0
370

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज (मंगळवारी) पार पडणार आहे. या दरम्यान आंदोलनाच्या तयारीत असलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाकपर यांनी पोलीस ठाण्यातच लाक्षणिक उपोषण सुरु केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (14 जून) देहूत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजता त्यांची सभा होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान यांच्या कार्यक्रमादरम्यान आंदोलनाच्या तयारीत असलेल्या भापकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलीस कालपासून भापकर यांच्यामागावर होते. आज सकाळी सात वाजताच पोलिसांनी भापकर यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून नजर कैदेत ठेवले आहे. भापकर यांनी पोलीस ठाण्यातच लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.