पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थांची फसवणूक, घरे मिळेपर्यंत भाडे द्या, मोर्चा काढण्याचा इशारा

0
302

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) -राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका विनया तापकीर यांनीचऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजनेतील गलथान, गहाळ कारभारावर प्रकाश टाकला आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या प्रकल्पाची पाहणी केली आणि जळजळीत वास्तव समोर आणले आहे. त्या म्हणतात, चऱ्होलीतील या योजनेत गोरगरिबांची खूप मोठी फसवणूक झाली आहे. या बेघर लोकांना घरे द्यायची म्हणून हा संपूर्ण प्रकल्प आहे, पण मुदत संपत आली तरी ते अर्धेसुध्दा पूर्ण झालेले नाही.

केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका तसेच लाभार्थ्यांच्या स्वहिस्यातून ही योजना आहे. महापालिका त्याबाबत खूप उदासिन आहे. ३१ मार्च पर्यंत ताबा देणारे होते, पण अजून बांधकामेच सुरू आहेत. आणखी दीड वर्षे ती पूर्ण होण्याची शक्यता नाही. महागाई प्रचंड वाढली आहे, आता या सामान्य नागरिकांनी करायचे काय. मनपाने ९० टक्के हिस्सा लाभार्थ्यांकडून भरून घेतला आहे.ठेकेदार म्हणतो बिलच वेळेत मिळत नाही. सामान्य नागरिकांनी पैसे भरले नाही तर त्यांना सळो की पळो केले जाते. इथे महापालिका प्रशासन उदायसिन आहे. वाढीव दराने काम दिले असूनही ते वेळेत पूर्ण नाही. ज्यांनी कर्ज काढले त्यांना हप्ते भरावे लागतात. त्या खर्चाचा बोजाखाली लाभार्थी दबलेत. हा अन्याय आहे, त्याला वाचा फोडणार. शेवटचा इशारा देते लवकर घरे दिली नाहीत, तर मनपाच्या दारात मोठा मोर्चा घेऊन येणार, असा इशाराही विनया तापकिर यांनी दिला.

दरम्यान, याबाबत ठेकेदार कायम म्हणतो त्याचेही व्हिडीओ शूट सौ. तपकीर यांनी केले आहे. त्यात तीन इमारती झाल्यात, नियोजित सात आहेत. येणाऱ्या काही महिन्यात घरांचे ताबे देण्याचा प्रयत्न असल्याचे तो ठेकेदार सांगतो. इलेक्ट्रिकचे काम झाले, रंगकाम सुरु आहे, लिफ्ट झाली, ड्रेनेजचे काम सुरू आहे. फक्त एकाचेच आरसीसी काम बाकी आहे. सात पैकी तीन इमारतींचे काम पूर्ण होत आले आहे.