पिंपरी दि. १५ (पीसीबी) – केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेतर्फे चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे गृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यात शहरातील आर्थिक दुर्बल घटकांना घरे मिळणार आहे. त्यांची सोडत काढली असून 90 टक्के स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र लाभार्थींना 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीस स्वहिस्सा रक्कम भरावी, असे आवाहन सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांनी केले आहे.
चऱ्होलीत 1 हजार 442, बोऱ्हाडेवाडीत 1 हजार 288 आणि रावेतमध्ये 934 अशा 3 हजार 664 सदनिका आहेत. त्यांची संगणकीय सोडत काढून विजेत्यांची यादी जाहीर केली आहे. लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही रक्कम न भरल्यास लाभ रद्द करण्यात येईल. याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.