– संघाचे शंभर वर्ष दोन समाजात दरी निर्माण करणारा असा इतिहास
नागपूर, दि. २९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात संघाच्या रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरासह ऐतिहासिक दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत, अशी माहिती आहे. प्रशासनाकडून कार्यक्रमाची रूपरेषा आखली जात असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुढीपाडव्याला नागपूरात आगमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (उद्या 30 मार्च) गुढीपाडव्याला नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट देणार असून त्यावेळी संघाचे विद्यमान सरसंचालक डॉ. मोहन भागवत हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग स्मृती मंदिर परिसरात जाणार आहे. दरम्यान, देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारे मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहे.
दरम्यान, याच मुद्द्याला घेऊन विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पंत प्रधानांच्या या नागपूर दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान झाल्यापासून मोदी कधीच आले नाही, आता येत आहे. त्यांच्या विजयात नरेंद्र मोदींचा करिष्मा नाही तर संघाचा करिष्मा आहे, असं पटलं असेल म्हणून ते येत आहे. असा टोला ही त्यांनी लगावला आहे.
संघाचे शंभर वर्ष दोन समाजात दरी निर्माण करणारा असा इतिहास राहिला आहे. पूर्वी स्वातंत्र्य काळापूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते. संघाची भुमिका परिस्थितीनुसार बदलली आहे. संघाचा अजेंडा विभाजनाचा आहे. तर काँग्रेसची भूमिका सर्वांना सोबत घेऊन चालणारी आहे. मात्र संघाची विचारधारा विशिष्ट विचाराला घेऊन चालणारी आहे. त्यामुळे शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने संघाची पुढची भूमिका बदलेल, अशी अपेक्षा ठेवूया. असेही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. पंतप्रधान मोदी 12 वर्षानंतर संघ मुख्यालयामध्ये येत आहे. म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास सूर्योदयापासून सूर्यास्थाकडे जातोय, असे म्हणावे लागेल. अशी टीका ही वडेट्टीवार यांनी केली आहे.