पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच केला मोठा खुलासा; निक्की-अरबाजची जोडी म्हणजे……

0
130

मुंबई, दि. ०१ (पीसीबी) : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतात पॅडा कांबळे यांनी निक्की आणि अरबाजविषयी प्रतिक्रिया दिली आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून नुकताच पंढरीनाथ कांबळे हे बाहेप पडले आहेत. पॅडी बाहेर जाताच अनेक जण भावुक झाले. पॅडी कांबळे यांची बिग बॉसच्या घरातील प्रवास ६२ दिवसांचा होता. घराबाहेर आल्यावर पॅडी कांबळे यांनी अनेक गोष्टीवर भाष्य केले आहे. त्यांनी त्यांचा घरातील प्रवास सांगत असताना अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी अरबाज आणि निक्कीच्या नात्याचा देखील उल्लेख केला. काय म्हणाले पॅडी कांबळे जाणून घेऊयात.

पंढरीनाथ यांना जेव्हा निक्की आणि अरबाज यांच्या घरातील नात्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ”त्यांच्यात कसली मैत्री… ती तर नुसती फालतुगिरी होती. मित्र आम्ही देखील होतो. मी-योगिता, मी -अंकिता ही मैत्री होती. या दोघांनी शो ऑफ करण्यासाठी अफेअर सुरु केलं होतं. अफेअरचं हे एक लेपन होतं. गुलूगुलू बोलायचे. घरात मैत्री पण, बाहेर जाऊन तुम्ही काय ते अफेअरचं बघा. एका बेडवर झोपायचे. तुमच्यात अशी किती दिवसांची ओळख होती. वर्षभर सुरू असलेल्या अफेअरमध्ये पण लोकं असे वागत नाही असे निक्की आणि अरबाज वागत होते.” अशी प्रतिक्रिया पंढरीनाथ यांनी दिली.

पंढरीनाथ पुढे म्हणाले की,”निक्की-अरबाज यांच्यातील हे नातं फक्त शोसाठी होतं. एक दिखावा सुरु होता. हा दिखावा तेव्हा फाटला जेव्हा निक्कीची आई घरात आली. तिने सत्य परिस्थिती काय आहे ती सांगितली. या सगळ्या गोष्टी निक्कीला तिची आई घरात आल्यावर समजल्या का. त्यानंतर मग ती बदलली का. आता ती अभिजीतबरोबर चांगली बोलतेय”

”अरबाज घराबाहेर गेल्यानंतर तिला आधार हवा होता, जो तिला अभिजीतच्या रुपात मिळाला. ती या घरात फक्त भांडणं आणि वाद करून पुढे जात आहे. पण अभिजीत सावंत खूप हुशारीने हा गेम खेळतोय.”