पंडीत नेहरू,अण्णासाहेब मगर, यशवंतराव चव्हाण यांच्यासह पिंपरी चिंचवड मधील चार सरपंच रंगमंचावर अवतरणार..!

0
10

दि. 2 ( पीसीबी )“पिंपरी चिंचवड शहर निर्मितीचा प्रवास” या नाटय प्रयोगामध्ये शहर निर्मितीमध्ये योगदान असलेले देश राज्य व चार खेडेगावांचे सर्व तत्कालीन सरपंच रंगमंचावर येणार आहेत.

येत्या मंगळवारी ४ मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहराच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त शहर निर्मितीच्या प्रवासावर नाट्य प्रयोग सादर होणार आहे. चिंचवड येथील सायन्स पार्क मधील प्रेक्षागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
‘पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास’ या लेखक विजय जगताप यांच्या ग्रंथावर हे नाटक आधारीत असून याचे दिग्दर्शन गणेश दिघे यांनी केले आहे. यावेळी रे क्रिएशनचे अविनाश आदक यांनी शहरावर बनविलेला दृकश्राव्य माहितीपट, ‘या नगरीला पिंपरी चिंचवड हे नाव कसं पडलं?’ या लिखित प्रसंगाचं अभिवाचन निवेदक संदीप साकोरे, आणि प्रा. माया मुळे करणार आहेत. तसेच लेखक विजय जगताप यांची मुलाखत आदी कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे.
वरील सर्व कार्यक्रमांसाठी सर्वांना मुक्त प्रवेश असल्याची माहिती संयोजक संभाजी बारणे यांनी दिली आहे.