पंजाब क्रिकेट असोसिएशनवर हरभजनसिंगचा मोठा आरोप

0
516

पंजाब दि. ८ (पीसीबी) – टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आत्तापर्यंत अनेक गोष्टीचे आरोप केले आहेत. तसेच तो अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो.माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनचे मुख्य सल्लागार हरभजन सिंगने राज्यातील क्रिकेट संघटनेच्या अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. भज्जीने पीसीए सदस्य आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या जिल्हा युनिट्सना पाठवलेल्या पत्रात कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव घेतलेले नाही. परंतु अनेक अधिकार्‍यांवर बेकायदेशीर कामात गुंतल्याचा आरोप केला आहे. भज्जीच्या या आरोपांनंतर पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये खळबळ उडाली आहे.

हरभजन ने या उपक्रमांबाबत राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवले आहे. राज्यभेचे खासदार हरभजनने आपल्या पत्रात लिहिले आहे की, या प्रकरणाचा मुख्य मुद्दा असा आहे की, पीसीए 150 सदस्यांना मतदानाचा हक्क देऊन आपल्या बाजूने झुकवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे बीसीसीआयच्या घटनेच्या पीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आणि नैतिक नियमांच्या विरुद्ध आहे.

हरभजन ने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, मला 10-15 दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याबद्दल तक्रारी येत आहेत. माझी मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, परंतु अनेक निर्णयांशी संबंधित आहेत. योजना पुन्हा पुन्हा अंधारात ठेवल्या जात आहेत. आज मला सांगण्यात आले की त्यांनी 60-70 लोकांच्या सभासदत्वासाठी पैसे घेतले आहेत. ही प्रक्रिया त्वरित थांबवण्याची गरज आहे. सदस्यांना वैयक्तिकरित्या पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना कळवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.