मुंबई, दि. ८ (पीसीबी) – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आमदारकीची संधी हुकली. मात्र आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे यांना मंत्री पद मिळावं यासाठी कार्यकर्ते आग्रह आहेत. आज बीड जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्या आणि पंकजा मुंडे यांच्या महिला समर्थकांनी बीड ते मोहटा देवी पायी दिंडी काढत पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावा यासाठी साकड घातलं. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्याशी मिळतेजुळते घेतल्याने आता त्यांना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे.
अनेक वेळा भाजपकडून आमदारकीसाठी हुलकावणी मिळाली असली तरी पंकजा मुंडे यांना जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपद मिळावं यासाठी महिला कार्यकर्त्यांनी ही पायी दिंडी काढली. पंकजा मुंडे यांना मंत्री पद मिळेल अशी अपेक्षा महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा परळीमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. खर तर या परभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र त्यानंतर अनेक वेळा पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात आलं.
ज्यावेळी विधान परिषदेवर जागा रिक्त होतात त्या प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवावं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येतं. प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येत खरं मात्र त्यांना हुलकावणीच मिळते. आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव असेल अशीही आशा कार्यकर्त्यांना आहे.
कधीकाळी गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असलेले भागवत कराड यांना खासदारकी देण्यात आली, आणि त्या पाठोपाठ यांना मंत्रिपदी देण्यात आलं. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असलेले रमेश कराड यांना देखील विधान परिषदेवरती संधी देण्यात आली, तसंच त्यांना लातूर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद देखील देण्यात आला.