पंकजा मुंडेंची नाराजी दूर होणार

0
322

पुणे, दि. २० (पीसीबी) – पंकजाताईंच्या रक्तात भाजप आहे. त्या कधीही दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करु शकत नाहीत.”अशा शब्दातं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा आहेत. भाजपमध्ये त्यांना डावललं जात असल्याने अनेकदा त्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या चाहत्यांकडूनही अनेकदा तशा तक्रारी केल्या जातात.

बावनकुळे यांनी नुकतीच ‘सरकारनामा’ ला मुलाखत दिली. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासारखं मराठवाड्यातील नेतृत्त्व बाजूला ठेवलं जात आहे. पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे. असं सर्वसामान्य मतदारांचं म्हणणं आहे. या प्रश्नावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंंकजा मुंडे यांच्याबाबत मी अत्यंत जबाबदारीने हे बोलत आहे. पंकजाताई माझ्यापेक्षाही क्षमतावान आहेत. त्या राष्ट्रीय सचिव आहेत. मध्यप्रदेशच्या प्रभारी आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वात मराठवाड्यात निवडणुका होणार आहेत. त्यांच्याबाबत पक्षाची भूमिका ठरली आहे, काही लोकांना पंकजा मुंडेंबद्दल सोशल मिडीयात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.