न्यायालयाकडून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती नाही

0
323

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला कोणतीही स्थिगीती नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पुढील कार्यवाही सुरू करू शकणार आहे. एकनाथ शिंदे गटाला हा मोठा दिलास आहे आणि उध्दव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेला मोठा फटका समजला जातो. शिवसेनेचे चिन्ह आणि खरी शिवसेना याबाबत आता निवडणूक आयोग काय ठरवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दिवसभराच्या सुनावणीत दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर अवघ्या एका ओळीत न्यायालयाने आपली ऑर्डर पास केली आहे. त्यानुसार आता निवडणूक आयोगाला धनुष्य कोणाचा हे ठरविण्याची मुभा मिळाली आहे. शिवसेनेची लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात असणार आहे. पक्ष चिन्हाबाबत ज्या याचिका दाखल आहेत ती फेटाळल्याने शिवसेनेते खळबळ आहे.