नोटा छपाई प्रकरणी माजी वित्त सचिवावर सीबीआय चा छापा

0
367

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने तथाकथित चलन छपाई प्रकरणात कथित अनियमिततेसाठी माजी वित्त सचिव अरविंद मायाराम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. CBI ने या प्रकरणात अरविंद मायाराम यांच्या घरावर छापे टाकले आहेत. दिल्ली आणि जयपूरमध्ये ही छापेमारी करण्यात आली होती

CBI ने आरोप केला आहे की मायाराम यांनी 2013 मध्ये ब्रिटीश-फर्म DelaRue ला भारतीय बँक नोटांसाठी विशेष कलर शिफ्ट (सेफ्टी थ्रेड) पुरवठा करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी बेकायदेशीर मुदतवाढ दिली. ब्रिटीश फर्मला दिलेल्या या अवाजवी मुदतवाढीमुळे भारतीय तिजोरीचे नुकसान झाले, असा आरोप यात करण्यात आला आहे. दरम्यान चलन छपाईसाठी देण्यात आलेल्या निविदेतील अनियमिततेत त्यांचा सहभाग असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.
10 जानेवारी रोजी दाखल केलेल्या सीबीआय रिपोर्टमध्ये ब्रिटीश फर्म, मायाराम, वित्त मंत्रालयाचे अज्ञात अधिकारी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी यांच्यामध्ये गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सीबीआय चौकशीत असे आढळून आले की मायाराम यांनी गृह मंत्रालय आणि अर्थमंत्र्यांची सुरक्षा मंजुरी नाकारून कालबाह्य झालेले कराराची मुदत ब्रिटीश फर्मला वाढवून दिली. सरकारने 2004 मध्ये DeLaRue इंटरनॅशनलशी करार केला होता. त्यानंतर हा करार डिसेंबर 2015 पर्यंत चार वेळा वाढवण्यात आला.