नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेपाच लाखांची फसवणूक

0
391

थेरगाव, दि. १६ (पीसीबी) – एका तरुणाने तो एका नामांकीत कंपनीत मोठ्या पदावर असल्याचे सांगत तिघांकडून लाखो रुपयांच्या वस्तू व काही रोख रक्कम घेतली. तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन त्याने तिघांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार १४ डिसेंबर २०२२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत डांगे चौक थेरगाव येथे घडली.

याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फरदिन फिरोज खान (वय २३, रा. चिंचवड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र गौरव होवाळे व विनय भदरे या तिघांना आरोपीने तो सायबेज या कंपनीचे डायरेक्टर पदावर असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून आरोपीने त्यांच्याकडून ईमेलद्वारे ॲपल कंपनीचे दोन लॅपटॉप, आयपॅड, सॅमसंग कंपनीचा फोल्ड मोबाईल, दोन आयफोन, वन प्लस मोबाईल व रोख रक्कम ५५ हजार असा एकूण ५ लाख ६३ हजार ४४८ रुपयांचा ऐवज घेतला. सर्व वस्तू v पैशांचा अपहार करून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.