नोकरी देण्याच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

0
175

दि २९ मे (पीसीबी ) – ऑनलाईन नोकरी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची सहा लाख 59 हजार 976 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 3 फेब्रुवारी ते 28 मे या कालावधीत राजयोग कॉलनी, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी सोबत सोशल मीडियाद्वारे संपर्क केला. त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना ऑनलाईन नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून सहा लाख 59 हजार 976 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.