नोकरीच्या बहाण्याने महिलेची 39 लाखांची फसवणूक

0
210

सांगवी, दि. १९ (पीसीबी) – नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेला आहे वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची 39 लाख 69 हजार 656 रुपयांची फसवणूक करण्यात आली हा प्रकार सहा एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला.

याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार सोशल मीडिया अकाउंट धारक आणि अनोळखी बँक अकाउंट धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेशी सोशल मीडियावरून संपर्क केला. महिलेला नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्यातून महिलेला वेगवेगळे टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने महिलेकडून 39 लाख 69 हजार 656 रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर महिलेला नोकरी न देता त्यांची फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.