नोकरीच्या बहाण्याने पावणे तेरा लाखांची फसवणूक

0
80

निगडी, दि. 16 (प्रतिनिधी)
नोकरीच्या शोधात असलेल्या एक तरुणाची 12 लाख 71 हजार 574 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 13 ते 16 मार्च या कालावधीत यमुनानगर, निगडी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली.

याबाबत 38 वर्षीय तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 11 अज्ञात बॅक अकाऊंट धारक, मोबाइल धारक व ग्रुप अ‍ॅडमीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना फोन केला. फिर्यादी यांना नोकरीची गरज आहे याची खात्री करून टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. फिर्यादी यांना 10 टक्के नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात 12 लाख 71 हजार 574 रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांची मूळ रक्कम तसेच नफा याची रक्कम परत देता फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.