नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक

0
379

थेरगाव, दि. ०३ (पीसीबी) – तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का असे विचारणा करून तरुणाला ऑनलाइन पद्धतीने तब्बल सात लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा सारा प्रकार 28 सप्टेंबर 2023 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने थेरगाव येथे घडला.

याप्रकरणी 30 वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.2) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून व्हाट्सअप क्रमांक धारक व दोन टेलिग्राम आयडी धारक तसेच विविध बँक खाते दार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांना आरोपीने त्यांच्या व्हाट्सअप वर क्रमांक वर मेसेज पाठवून तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का अशी विचारणा केली. यावेळी फिर्यादी यांनी त्याला प्रतिसाद दिल्यानंतर आरोपीने फिर्यादीला टेलिग्राम द्वारे टास्क देऊन ते टास्क पूर्ण करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवले . यावेळी त्यांना टास्क साठी वेगवेगळ्या बँकेत रक्कम जमा करण्यास लावून त्यांच्याकडून एका दिवसात तब्बल 7 लाख 3 हजार 270 रुपयांची फसवणूक केली. यावरून माकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.