दिघी, दि. २७ (पीसीबी) – नोकरी लावतो असे आमिष दाखवून महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापीत करणाऱ्याला दिघी पोलिसांनी अटक केले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.23) दिघीतील आळंदी रोडवर घडला आहे.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रदिप अनंतराव दिघे (वय 57 रा.दिघी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने फोनवरून संपर्क साधला, त्यांना तुम्हाला माझ्या कंपनीत नोकरी लावतो असे आमिष दाखवले,त्यांना भेटायला बोलावून फिर्यादीला घेऊन आळंदी रोड येथे आला व त्याने फिर्यादीशी जबरदस्ती शारीरिक संबध ठेवत त्यांचा फसवणूक केली. यावरून आरोपीवर बलात्कार तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनीयम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दिघी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.