महाळुंगे, दि. 13 (पीसीबी)
नोकराला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. याबाबता जाब विचारल्याने मालकालाही मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. १२) दुपारी दीड वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कडवस्ती, खराबवाडी येथे घडली.
लालासाहेब नवनाथ कड (वय ४०, रा. सारा सीटी, खराबवाडी, ता.खेड, जि. पुणे) असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी याबाबत महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहीदास बबन कड (वय ४५), धिरज रोहीदास कड (वय २१), तन्मय रोहीदास कड (वय १९, सर्व रा. खराबवाडी, ता खेड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्याकडे कामास असलेला रोहीत कुरमे हा फिर्यादी यांच्या बिल्डींगच्या बाजूची स्वच्छता करत होता. त्यावेळी आरोपींनी आपसांत संगनमत करून त्यास शिवीगाळ व मारहाण केली. फिर्यादी यांनी त्यांना मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेले असता, रोहीदास बबन कड याने शिवीगाळी केली. त्यांचा मुलगा तन्मय कड याने लाकडी दांडक्याने तर धिरज कड याने एका हातात लोखंडी तलवार घेऊन दुस-या हातातील हातात मावेल एवढा दगड फिर्यादी यांच्याकडे फेकून मारल्याने त्यांच्या कपाळावर जखम झाली. तसेच सर्वानी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.