नोकराने घातला मालकाला साडेसहा लाखांचा गंडा

0
72

वाकड, दि. ०८ (पीसीबी)

ग्राहकांनी दिलेले पैसे परस्‍पर आपल्‍या वैयक्‍तिक खात्‍यावर घेत नोकराने मालकाची ६ लाख ६२ हजार ४८७ रुपयांची फसवणूक केली. ही घटना मानकर चौक, वाकड येथे घडली.

चिराग सुधीर मुथा (वय ३१, रा. सॅलीसबेरी पार्क, गुलटेकडी, पुणे) यांनी याबाबत गुरुवारी (दि. ७) याबाबत वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयुरेश सुधाकर वाघमारे (रा. धानोरी, पुणे) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना ९ ऑगस्‍ट २०२४ ते ६ ऑक्‍टोबर २०२४ या कालावधीत चोक वाकड ऑरेंज मोटोरॅड या शोरूममध्‍ये घडली

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी मयुरेश वाघमारे हा चेतक वाकड ऑरेंज मोटोरेंड या शोरूममध्‍ये सेल्‍समन म्‍हणून कामाला असताना त्याने १० ग्राहकांना चेतक टु व्‍हिलर बुक करण्यासाठी जर त्यांनी आरोपी याच्‍या वैयक्तिक खात्यावर पैसे पाठविले तर त्यांना चेतक टू-व्हिलर गाडीवर मोठा डिस्कांऊट मिळवून देईल, असे आमीष दाखविले. ग्राहकांचा विश्‍वास संपादन करुन, त्यांची फसवणुक व दिशाभूल करुन काही लोकांचे पैसे स्वतच्‍या गुगल पे वर घेत तर काही जणांकडून रोख स्‍वरूपात घेऊन कंपनीची ६ लाख ६२ हजार ४८७ रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.