नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्या जागेवर आता एच.एस. सोनवणे

0
240

पुणे, दि. ११ (पीसीबी) – राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व नियंत्रक, मुद्रांक शुल्क पदावर ज्येष्ठ सनदी आधिकारी एच. एस. सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोनावणे यांनी सोमवारी या पदाचा कार्यभार श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. राज्यातील सनदी तसेच पोलीस आधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, अचानकपणे फक्त सोनवणे यांची एकट्याचीच बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, हर्डीकर यांची पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली होणार असल्याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, हर्डीकर यांच्या जागी सोनवणे यांची बदली झाली.सोनवणे यांनी हर्डीकर यांच्याकडून पदाची सूत्रे सोमवारी स्वीकारली तरी हर्डीकर यांना नवी कोणतीच नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे याची पुण्याच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हर्डीकर हेच पुण्यात नवे आयुक्त म्हणून येणार अशी चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून असल्याचे आता उत्सुकता वाढली आहे.

पुणे महापालिकेत सध्या विक्रमकुमार आयुक्त म्हणून काम पाहात आहेत. त्यांनाही बदलीची प्रतिक्षा आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांची नव्याने नियुक्ती झाली. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी, विभागीय आयुक्त व पुणे महापालिका आयुक्तांची बदली अद्याप प्रतिक्षेत आहे. या सर्व आधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत वारंवार चर्चा होत असतात. त्यामुळे सोनवणे यांच्या बदलीच्या निमित्ताने सर्वच आधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू झाली.

पुण्यात काम करण्याची संधी मिळावी यासाठी सर्वच आधिकारी उत्सुक असतात.परिणामी पुण्यात बदली व्हावी यासाठी प्रत्येकजण आपल्या पातळीवर प्रयत्न करीत असतो. महापालिका आयुक्त विक्रमकुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अशिष प्रसाद हे यांचा पुण्यातला कार्यकाल उलटून गेला आहे. त्यामुळे या सर्वांची बदली अपेक्षित आहे. येत्या काही दिवसात नव्या नियुक्त्या होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.