नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांकडून शौर्याचे प्रदर्शन…‘उम्मीद 2022’ उपक्रम उत्साहात साजरा

0
234

पिंपरी, दि. २७ (पीसीबी)- चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने 21 आणि 22 डिसेंबर 2022 रोजी मार्शल कॅडेट फोर्स (MCF) द्वारे ‘उम्मीद 2022’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात सादरा करण्यात आला. यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलागुणांचे आणि आपल्या शौर्याचे प्रदर्शन केले.

शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते पवनराज पाटील आणि बीएसएफ कमांडर विनोद वशिष्ठ उपस्थित होते. या वेळी नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. मानसी हसबनीस, तांत्रिक विभागप्रमुख समीर जेऊरकर, पालक संघ, विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ होण्यासाठी शिक्षणाबरोबर खेळ आवश्यक असतात. याची प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता चौथीच्या चिमुकलीने जीप लाईनद्वारे एका वेगळ्या शौर्याचे प्रदर्शन केले. एमसीएफच्या प्रशिक्षकांनी पोल मलखांब, झिपलाईन, पिटी एक्सरसाइज, फायर जंप, जिम्नॅस्टिक ऑफ सिकल्स, कुंफू, रिंगडान्स असे विविध खेळ विद्यार्थ्यांकडून करून घेतले. ‘उरी अटॅक’चे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करण्यात आले. यातून भारतीय जवानांविषयीचा आदर आणि सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक विद्यार्थिनींनी देखील आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत त्याही कुठे कमी नसल्याचे दाखवून दिले.

अमित गोरखे म्हणाले की, “नॉव्हेल विद्यालय दरवेळी वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या विद्यालयांतील विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सहभाग त्यात करून घेते. जेणे करून विद्यार्थी हा फक्त शैक्षणिकच नाही, तर त्याचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या आपल्या पालकांकडून अनन्यसाधारण अपेक्षा असतात आणि म्हणूनच या कार्यक्रमाचे नाव विद्यालयाने ‘उम्मीद 2022’ म्हणून ठेवले . नॉव्हेल च्या मुख्याध्यापिका मानसी हसबनीस या दरवेळी वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यास विद्यार्थी, पालक आणि संस्थेच्या प्रत्येकाची साथ मिळते असते”.