नेहरूनगरमध्‍ये सहा लाखांची घरफोडी

0
116

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आली.

भाऊसाहेब गणपत चांदगुडे (वय ४२, रा. साई मंदिरासमोर, नेहरूनगर, पिंपरी) यांनी गुरुवारी (दि. २२) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार फियादी चांदगुडे यांच घर १६ ऑगस्‍ट ते २२ ऑगस्‍ट दरम्‍यान कुलूप लावून बंद होते. त्‍यादरम्‍यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्‍या दरवाजाचे कुलूप तोडून आतील नऊ तोळे ११२ ग्रॅम वजनाचे पाच लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्‍याचे दागिने चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.