नेहरूनगरमध्ये रिक्षा थांबवून चालकाचा मोबाईल पळवला

0
272

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – नेहरूनगर, पिंपरी येथे अनोळखी व्यक्तीने एका रिक्षाला थांबवून चालकाचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री पावणे बारा वाजता घडली.

संतोष तुळशीदास शिंगे (वय 40, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. ते रविवारी रात्री पावणे बारा वाजता नेहरूनगर मधील संतोषी माता चौकातून रिक्षा घेऊन जात होते. त्यांच्या पाठीमागून एक व्यक्ती दुचाकीवरून आला. त्याने शिंगे यांना रिक्षा थांबवण्यास सांगितले. ‘तू मला पाठीमागे रिक्षा का आडवी मारली’ असे म्हणून शिंगे भांडण करून रिक्षात समोर ठेवलेला चार हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.