नेहरूनगरमधील विठ्ठलनगर परिसरात हवेत कोयता फिरवत दहशत

0
421

 पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – नेहरूनगरमधील विठ्ठलनगर परिसरात हवेत कोयता फिरवत दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात काहीजण जखमी झाली असून या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली.

दिलीप कस्तूर देहाडे (वय-47 रा. निवारा हौस. सोसायटी विठ्ठलनगर नेहनगर पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यश विकास मांढरे दोन अल्पवयीन मुलांवर तसेच पाच ते सहा अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर यश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, प्रेम सूर्यवंशी उर्फ बंडल्या (वय-19 रा. विठ्ठलनगर नेहनगर पिंपरी ) साहिल सूर्यवंशी (वय-19 रा. सदर ) अमन हौसराव शिंदे( वय-25 ) महिला आरोपी, सुजित ( पूर्ण नाव माहित नाही ), अजित बिराजदार ( पूर्ण नाव माहित नाही), पंकज ओव्हाळ ( पूर्ण नाव माहित नाही ) अनोळखी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप घरात असताना 10 ते 12 मुले फिर्यादी यांच्या बिल्डींगच्या खाली आली. त्यांच्या हातात कोयते होते. ते सदर परिसरात गोंधळ घालत होते तसेच हवेत कोयते फिरवत दहशत माजविण्याचा प्रयत्न करत होते . त्यांना घाबरून परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले व त्यांना घाबरून खाली असलेले लोक सैरावैरा इकडे तिकडे धावू लागली . त्यांनी अचानक फिर्यादी दिलीप यांच्या बिल्डींगच्या खाली पार्क केलेल्या गाड्यांचे त्यांच्याकडे असलेल्या कोयत्याच्या सहाय्याने नुकसान करण्यास सुरवात केली. आम्ही लगेच खाली आलो तर ती मुले पळून गेली परंतु त्यातील एका मुलाला पळून जाताना परिसरातील लोकांनी पकडले.