नेपाळ, दि. ६ –
नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका तासाच्या आत सलग सहा भूकंप झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 मोजली गेली. या भूकंपाचे धक्के भारत आणि बांगलादेशच्या अनेक भागात जाणवले. परंतु भूंकपाचा केंद्रबिंदू तिबेट होता. या भूकंपात किमान 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. 38 लोक जखमी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी 6.52 च्या सुमारास भूकंप झाला. नेपाळमधील काठमांडू, धाडिंग, सिंधुपालचौक, कावरे, मकवानपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारतातील अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, मात्र भारतातून अद्याप कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही. रॉयटर्सच्या बातमीनुसार, तिब्बेटमध्ये या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. तिब्बेटच्या शिगात्से शहरात अनेक इमारती उद्धवस्थ झाल्या आहेत.