नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांचा राजिनामा, बालेन शाहा नवे पंतप्रधान

0
6

दि.९ (पीसीबी) – सध्या नेपाळमध्ये अराजक माजले आहे. सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे Gen Z रस्त्यावर उतरले. त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. काही नेत्यांच्या घरांवर देखील तरुणांनी हल्ला केला. त्यानंतर ओली सरकारमधील तीन नेत्यांनी राजिनामा दिला. त्यापाठोपाठ नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी देखील राजिनामा दिला. त्यांच्या राजिनाम्यानंतर काठमांडूमध्ये जल्लोष करण्यात आला. आता एका महापौराचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जात आहे. Gen Zकडून या महापौराला पंतप्रधान बनवण्याची मागणी होत आहे.

सध्या नेपाळमध्ये मोठी राजकिय उलथापालथ झाली आहे. नेपाळमधील सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी बालेश शाह आहेत. बालेन शाह हे काठमांडूचे महापौर आहेत. तरुणांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. बालेन शाह यांनी सोशल मीडियावरील बंदी विरोधात काढण्यात आलेल्या Gen Zच्या रॅलीला पाठिंबा दर्शवला होता. बालेश शाह यांनी महापौर पदाचा राजिनामा देऊन देशाची धूरा सांभाळावी अशी मागणी Gen Z आंदोलकांनी केली आहे.

मी आंदोलकांच्या आकांक्षा, उद्दीष्टे आणि विचार समजून घेऊ इच्छितो. राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते, खासदार आणि प्रचारकांनी रॅलीचा स्वार्थासाठी वापर करु नये असे बालेन शाह यांनी म्हटले होते. याआधी पासूनच बालेश शाह यांचा केपी ओली यांच्याविरोधात संघर्ष सुरुच होता.

बालेन शाह यांनी सिव्हिल इंजिनीअर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते रॅपर बनले आणि शेवटी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काठमांडूचे महापौर बनून त्यांनी तरुणांमध्ये लोकप्रियता मिळवली आणि पारंपरिक पक्षांपासून निराश झालेल्या लोकांमध्ये ते नायक बनले.

नेपाळमधील Gen-Z आंदोलनाची सुरुवात राजकारण्यांच्या मुलांच्या ऐषोआराम आणि सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीविरुद्ध झाली. तरुणांनी शांततापूर्ण विरोध प्रदर्शन सुरू केले, परंतु सरकारच्या कठोर कारवाईदरम्यान 23 लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जण जखमी झाले. बालेन शाह यांनी या संपूर्ण आंदोलनात तरुणांचा विश्वास आणि पाठिंबा मिळवून नेतृत्व केले. सोशल मीडियावर #GenZMovement सारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत आणि जनतेमध्ये राजकीय जागरूकतेची एक नवी लाट दिसत आहे.