नेत्यांची पोरबाळ सहजपणे गुंडांच्या खांद्यावर हात – संजय राऊत

0
171

पुणे, दि. २९ (पीसीबी) – पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे, पण आता ही गुंडांची राजधानी झाली आहे. नेत्यांची पोरबाळ सहजपणे गुंडांच्या खांद्यावर हात टाकत आहेत. यातून लोकांनी कोणता आदर्श घ्यावा?, लोकांनी स्वतःला सुरक्षीत कसे समजायचे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत की गुन्हेगारांचे बॉस याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली. कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरणात भाजपच्या नेत्यांनी त्याचे समर्थन केले त्याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, आम्ही काही केले तरी आमच्यावर काही कारवाई होणार नाही असे भाजपचे लोक जाहीरपणे सांगत आहेत.

गुन्हेगारांच्या भाषेत डॉनला बॉस म्हणतात. मुंबईत हे आम्ही सर्व काही पाहिले आहेत. सागर बंगल्यावरचे जे बॉस आहेत, त्यांनी ते गृहमंत्री आहेत की बॉस आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे. लोकसभेच्या जागावाटपावर राऊत म्हणाले, ‘जागा वाटपाला फॉर्म्युला नाही तर आम्ही योग्य जागा वाटप म्हणतो.
ज्या जागांवर सध्याचे खासदार आहेत त्यावर फार चर्चा केली जाणार नाही. आम्ही सगळ्यांना सोबत घेत आहोत, राजू शेट्टी, संभाजीराजे यांच्याशी देखील आम्ही चर्चा करू.
नितीश कुमार गेले म्हणून इंडिया आघाडीला धोका असा नाही, नितीश कुमार यांची प्रकृती फारशी चांगली नाही, ना स्मृती विस्मरण होतं आहे, त्यामुळे ते इंडिया आघाडीसोबत आहेत हे बहुतेक ते विसरून गेले असतील. महाराष्ट्रात तुम्ही शिवसेनेवर नाही तर आमच्या स्वाभीमानावर घाव घातला आहे, त्यामुळे इथे आम्हाला आमंत्रण देण्याची भाजपमध्ये हिंमत नाही. आम्ही कधी ही तडजोड करणार नाही. भाजपचे पाय लटपटत असल्याने त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, नितीश कुमारांना तोडण्याचे उद्योग केले आहेत, अशी टीका केली.

नार्वेकरांची नियुक्ती हा सर्वात मोठा फ्रॉड
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली त्यावर राऊत यांनी कडाडून टीका केली. ‘नार्वेकर यांनी १० वेळा पक्षांतर करून ही पक्षांतरे पचवून ढेकर देत आहेत. शिवसेनेच्या फुटीला बेकायदेशीरपणे मान्यता दिली अशा व्यक्तीला पक्षांतर बंदी कायदा समितीवर बसवणे हा सर्वात मोठा फ्रॉड आहे.