नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर नसीरुद्दीन शाह यांची पहिली प्रतिक्रिया

0
490

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाराजीचा सामना करावा लागत आहे. देशात कानपूर तसंच अन्यत्रही हिंसक घटना झाल्या. शिवाय, आखाती देशांनीही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन हे विष पसरण्यापासून थांबवलं पाहिजे, असं मत मांडलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रकरणावर आपली स्पष्ट मतं मांडली.

“या लोकांमध्ये चांगली भावना निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसंच धर्मसंसदेत (हरिद्वार) जे बोललं गेलं त्यावर त्यांचा विश्वास असेल तर त्यांनी तसं सांगावं आणि नसेल तर तसंही स्पष्ट करावं,” असं आवाहन नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.