नुकसान भरपाई मागत दोघांना मारहाण

0
176

निगडी, दि. १९ (पीसीबी) – वाहनांची धडक झाल्यानंतर टेम्पो चालकाला नुकसान भरपाई मागत कार मधील आठ जणांनी दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना २२ डिसेंबर रोजी दुपारी रामनगर, चिंचवड येथे घडली.

खालिद अकील मुजावर (वय २३, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश उर्फ दाद्या भोसले (वय ३५) आणि त्याचे सहा ते सात साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या चुलत्याकडे पिकअप आहे. त्यावर मारुती गोपाळे हे चालक म्हणून काम करतात. २२ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिकअपचा अपघात झाल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली. त्यामुळे फिर्यादी अपघाताच्या ठिकाणी गेले. तिथे आरोपींची स्कॉर्पिओ पिकअपला पाठीमागून धडकली होती. तरी देखील स्कॉर्पिओ मधील आरोपी पिकअप चालक मारुती गोपाळे यांच्याकडे नुकसान भरपाई मागत होते. फिर्यादी तिथे गेल्यानंतर आरोपींनी गोपाळे आणि फिर्यादी यांना मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.