उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र
दि. 2 ( पीसीबी )धडाडीचे कार्यकर्ते आणि उद्योजक निलेश मुटके यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला. भाजप आमदार महेश लांडगे यांच्या बालेकिल्ल्यात भोसरी परिसरात निलेश यांचे सामाजिक कार्य आहे. महापालिकेला २०१७ मध्ये शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली.
पक्ष प्रवेशाबद्दल ते म्हणतात,
शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आजपासून माझा नवीन राजकीय प्रवास सुरू होतोय. कालपर्यंत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अनेक वर्ष निष्ठेने काम केले. पक्षाने मला महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली व ती निष्ठेने पार पाडली. याबद्दल मी उद्धव साहेब ठाकरे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु माझे नातेवाईक व मार्गदर्शक मित्र आमदार शरद सोनवणे , शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या आग्रहाने मला शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. मी सन्माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, आमदार शरद सोनवणे व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनात पक्ष वाढवण्याचे काम करेल तसेच यापुढेही अशाच जोमाने लोकसेवा करण्याचा प्रयत्न करेल.
हिंदुत्वासाठी तसेच जनसेवेसाठी अनेक पक्ष एकत्र काम करत असतात. कदाचित दोन्हीही शिवसेना पुन्हा एकत्र येतील की नाही मला माहित नाही, परंतु माझी श्री उद्धव जी बाळासाहेब ठाकरे व शिवसेना (उ.बा.ठा.) यांच्या बद्दल कोणतीही तक्रार नाही.