नि:शुल्क खुली राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा

0
887

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत..!या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे.आपले विचार मुक्तपणे मांडण्यासाठी शब्दांची मर्यादा नाही.

दरवर्षी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी समाजात होणेसाठी आणि देशाभिमान जनसामान्यात निर्माण होण्यासाठी ही खुली स्पर्धा आयोजित करण्यात येते.

या स्पर्धेला निबंध पाठविताना लेखी स्वरुपात पाठवावा.यात सहभागी होणा-या स्पर्धेकाला फोरकलर सन्मानपञ सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.विजेत्यांना सन्मानचिन्ह,सन्मानपञ,शाल,
श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे.

सर्व नागरिक,युवक,युवती,शालेय विद्यार्थी वर्ग,काॅलेज वर्ग,प्राध्यापक,विचारवंत,शिक्षक
,कामगार,सामाजिक कार्यकर्ते,महिला भगिनी ,ज्येष्ठ नागरिक,सर्व कर्मचारी वर्ग व पञकार इ.सर्व स्तरातील मंडळींनी यात सहभाग घेण्याचे आवाहान साई कला आविष्कार नाट्य संस्था,पुणे च्या वतीने करण्यात आले आहे.

निबंध पाठविण्याची अंतिम दिनांक ३० मार्च २०२४ अखेर आहे.

निबंध पोष्टाने पाठविण्याचा पत्ता-
प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे,
साई कला आविष्कार नाट्य संस्था, साई सदन,ए/३,महालक्ष्मी हाईटस, पी.सी.एम.टी.चौक, भोसरी,पुणे-४११०३९.मोबा.९६५७३४८६२२ वर मुदतीत निंबध पाठविणे आवश्यक आहे.

अशी माहिती साई कला आविष्कार नाट्य संस्थेच्यावतीने देण्यात आली आहे.