निवडणूक लढवली, जिंकलाही…पण त्या आधीच मृत्यूने गाठले, वाचा सविस्तर

0
301

उत्तर प्रदेश,दि.१८(पीसीबी) – उत्तर प्रदेशात नगरपालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. निवडणुकीत विजयी झालेला उमेदवार आयुष्याच्या लढाईत पराभूत झाला आहे. संतराम असे मृत उमेदवाराचे नाव आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

4 आणि 11 मे रोजी यूपीमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. या निवडणुकीची मतमोजणीही पार पडली. पहिल्या टप्प्यात यूपीच्या 37 जिल्ह्यांतील 10 महानगरपालिका, 104 नगर परिषदा आणि 276 नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या. दुसऱ्या टप्प्यात 38 जिल्ह्यांतील 7 महानगरपालिका, 95 नगरपरिषद आणि 268 नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या कादीपूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मृत उमेदवार संतराम हे निराला नगर वॉर्डातून विजयी झाले आहेत. संतराम यांनी संतराम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना एकूण 217 मते मिळाली. संतराम यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश यांचा तीन मतांनी पराभव केला आहे.

मृत उमेदवार संतराम यांनी शेती आणि व्यवसाय सांभाळत निवडणुक लढवली. संतराम हे शेतकरी आहेत. बियाणे, फळे, भाजीपाला यांचा ते व्यवसाय करायचे. संतप्रसाद 65 वर्षांचे होते. दोन मुले आणि पाच मुली असे त्यांचे मोठे कुटुंब आहे. त्यांच्या सर्व मुली विवाहित आहेत.

कसा झाला विजयी उमेदवाराचा मृत्यू
निवडणुकांचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच संतराम यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे त्यांच्या प्रभागात शोककळा पसरली आहे. सर्वचजण त्यांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त करत आहे. संताराम हे शेतात काम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांटा मृत्यू झाला आहे. संतराम यांच्या जाण्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे. यामुळे निराला प्रभाग क्रमांक 10 मध्ये पुन्हा पोट निवडणूक होणार आहे.