निवडणूक रोखे प्रकरण -पुण्यातील बी.जी.शिर्के कंपनी देशातील टॉप टेन देणगीदारांत

0
251

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – देशात गाजत असलेल्या निवडणूक कर्जरोखे प्रकऱणात बड्या देणगीदारांत एकमेव मराठी नाव आल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. बांधकाम क्षेत्रात सर्वश्रृत अशा बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रायव्हेट लमिटिडेड कंपनीचे नाव आहे.

देशातले टॉप २० देणगीदार
१. १३६८ कोटी – फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड – लॉटरीचा व्यवसाय करणारी ही कंपनी १९९१ साली स्थापन झाली असून त्यांचं मुख्यालय तामिळनाडूच्या कोयम्बतूरमध्ये आहे.

२. ९६६ कोटी – मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड – १९८९ साली स्थापन झालेली ही कंपनी धरणे व ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून तेलंगणात मुख्यालय आहे.

३. ४१० कोटी – क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड – २००० साली स्थापन झालेली ही कंपनी लॉजिस्टिक्स आणि माल पुरवठा सुविधांच्या सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.

४. ३७७ कोटी – हल्दिया एनर्जी लिमिटेड – पश्चिम बंगालच्या हल्दियामध्ये या कंपनीच्या मालकीचा थर्मल पॉवर प्लांट आहे. २०१५मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीनं पुढच्या पाच वर्षांत तब्बल ३७७ कोटींची देणगी राजकीय पक्षांना दिली आहे!

५. ३७६ कोटी – वेदांता लिमिटेड – खाण उद्योगात देशातलं अग्रगण्य नाव असलेल्या या कंपनीची स्थापना १९६५ साली झाली. वेदांता देशातील सर्वात मोठी अॅल्युमिनियम उत्पादक कंपनी आहे.

६. २२५ कोटी – एस्सेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड – मुंबईतली ही कंपनी कच्च्या लोखंडाच्या खाणकाम उद्योगात कार्यरत असून १९५० साली स्थापन झाली आहे.

७. २२० कोटी – वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी – ऊर्जेचं उत्पादन आणि वितरण या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत असून २००९ साली स्थापन झाली आहे.

८. १९८ कोटी – भारती एअरटेल – १९९५ साली स्थापन झालेली भारती एअरटेल कंपनी मोबाईल नेटवर्किंगच्या क्षेत्रात कार्यरत असून कंपनीचं मुख्यालय दिल्लीत आहे.

९. १९५ कोटी – केवेंतर फूड पार्क इन्फ्रा लिमिटेड – डेअरी आणि FMCG उत्पादनांच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. पश्चिम बंगालमध्ये कंपनीचं मुख्यालय आहे.

१०. १९२ कोटी – एमकेजे एंटरप्रायजेस लिमिटेड – स्टेनलेस स्टील व्यवसायात मोठं नाव असणारी ही कंपनी १९८२ साली स्थापन झाली असून कंपनीचं मुख्यालय कोलकात्यात आहे.

११. १८६ कोटी – मदनलाल लिमिटेड

१२. १६२ कोटी – यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

१३. १४६ कोटी – उत्कल अॅल्युमिनियम इंटरनॅशनल लिमिटेड

१४. १३० कोटी – डीएफएल कमर्शियल डेव्हलपर्स लिमिटेड

१५. १२३ कोटी – जिंदाल स्टील अँड पॉवर्स लिमिटेड

१६. ११९ कोटी – बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रायव्हेट लमिटिडेड

१७. ११५ कोटी – धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

१८. ११३ कोटी – अवीस ट्रेडिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

१९. १०७ कोटी – टोरंट पॉवर लिमिटेड

२०. १०५ कोटी – बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड