दि.०२(पीसीबी)-राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर होणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्देश दिले आहेत. यामुळे राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान केलेल्या जनतेला निकालासाठी आणखी अठरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणूक आयोग आणि न्यायालय यावर बोलणे योग्य नाही,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.दरम्यान, मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांचे स्वागत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून करण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, “पक्षात परत येणाऱ्यांचे स्वागत आहे; धुळफेक केलेले आणि कट्टर शिवसैनिक हे परत येत आहेत.”
याशिवाय, उद्धव ठाकरे यांनी राजकारणातील प्रदूषण आणि भाजपवर टीका करत म्हटले की, “दगाबाज भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना केली. हवेत प्रदूषण आहे तसेच राजकारणातही आहे. काँग्रेस बरोबर गेले, नावाची चर्चा करून धुळफेक केली. अजित पवार निधी देत नाही, अशा अनेक कारणांनी लोक असंतुष्ट होते.”उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भगव्यावर कोणतेही चित्र नछापण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्पष्ट केले की भगवा शिवरायांचा पवित्र ध्वज आहे आणि तो तसाच फडकत राहावा.











































