निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची केली तपासणी

0
40

मुंबई, दि. १३ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करतानाचा व्हिडिओ केला शेअर
आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक प्रचारासाठी जात असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बॅग आणि हेलिकॉप्टरची नियमित तपासणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल एक्सवर पोस्ट केला. ‘स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी अशी उपाययोजना आवश्यक आहेत’, असे सांगून त्यांनी सर्वांनी कायद्याचा आदर करावा आणि लोकशाहीची अखंडता अबाधित राखण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.

आज निवडणूक प्रचारासाठी जात असताना निवडणूक आयोगाने माझ्या बॅग आणि हेलिकॉप्टरची नियमित तपासणी केली. मी पूर्ण सहकार्य केले आणि विश्वास आहे की मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी अशा उपाययोजना आवश्यक आहेत. आपण सर्वांनी कायद्याचा आदर करूया आणि लोकशाहीची अखंडता अबाधित राखण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊया, असे अजित पवार यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केले आहे.