निवडणुकीत जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल – देवेंद्र फडणवीस

0
112

पुणे, दि. ४ (पीसीबी) लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित दिवसांत पक्षाच्या उमेदवाराचा अधिकाधिक प्रचार कसा करता येईल यासाठी रणनीती आखली जात आहे. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती, पुणे शहर, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे 7 आणि 13 मे रोजी मतदान होत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान मंगळवारी 7 मे रोजी तर उर्वरित तीन लोकसभा मतदार संघाची निवडणूक 13 मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पुणे शहरातील माजी नगरसेवक यांची एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या.

कोरेगाव पार्क येथील एका मंगल कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. पुणे महापालिका तसेच पुणे कॅन्टोन्मेंट भागातील नगरसेवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. भाजपाच्या शहरातील आमदार देखील या बैठकीला उपस्थित होते. शहराध्यक्ष सरचिटणीस उपाध्यक्ष सचिव तसेच राज्य पातळी संघटनेचे पदाधिकारी देखील यावेळी हजर होते.

लोकसभा निवडणूक भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने या निवडणुकीच्या काळात कोणतीही चूक करू नका. प्रकार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यामुळे आपल्या भागात बरोबर जाऊ मतदारांची भेट घ्या. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची माहिती मतदारांना द्या. मतदानाच्या दिवशी अधिकधिक मतदार मतदान केंद्रांवर कसे येते यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना फडणवीस यांनी माजी नगरसेवकांना केल्या.

निवडणुकीत आतापर्यंत तुम्ही चांगले काम केले आहे यापुढे काळातही अतिशय प्रभावीपणे काम करत रहा त्याची दखल पक्षकडून घेतली जाईल. निवडणुकीत जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात टाळाटाळ करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

लोकसभा झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे याकडे लक्ष असू द्या, असेही त्यांनी सुनावले. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसरमध्ये इतर पक्षांचे उमेदवार उभे आहेत, त्यांचेही काम जोमाने करा, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.