निवडणुका पुढे ढकलल्यास ओबीसी आरक्षणाला वेळ मिळेल

0
226

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : पावसामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यास राजकीय ओबीसी आरक्षणासाठी ते फायदेशीर ठरेल, असा आमचा विश्वास आहे. कारण, राजकीय ओबीसी आरक्षणासाठी आणखी वेळ मिळेल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत व्यक्त केले.

सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाची शिष्टमंडळ भेट घेईल. सर्व ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतीचे सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित राहणार, असे दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. यानुसार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.