निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयचे एन्काऊंटर

0
74

ठाणे, दि. 25 (पीसीबी) : बदलापूरातील नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर आत्याचार केलेल्या आरोपीचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. तळजो कारागृहातून अक्षयला घेऊन येत असताना मुंब्रा बायपासवर अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या रक्षणासाठी अक्षयवर गोळीबार गेल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकरामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.

काय आहे प्रकरण?
विरोधी पक्ष नेते यांनी हा फेक एन्काऊंटर आहे असं म्हटलं आहे. तर अक्षयच्या चेहेऱ्यावर काळा कपडा आणि हातात हात घड्या असताना अक्षय पोलिसांवर गोळीबार कसं करु शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, अक्षयच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या वेळी काही खुलासे करण्यात आले आहेत.

नक्की काय घडलं?
अक्षय पळून जाण्याच्या स्थितीत नव्हता किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावून घेण्याची त्याची शारीरिक क्षमताही नव्हती. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे, असा दावा वकिलांनी केला. हा फेक एन्काऊंटर झालाय. न्यायालयाने या प्रकरणात विषेश पथक दाखल करावे, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वकिलाने केली आहे.