निर्मला सितारामण यांचा ताफा आप च्या कार्यकर्त्यांनी आडवला

0
351

पुणे, दि. २२ (पीसीबी) : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा ताफा ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी वारजे येथे अडवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ आहे.

महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला. यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.