नियोजित पत्नीवर बलात्कार; आरोपी अटकेत

0
384

पिंपरी दि. १३ (पीसीबी) -नियोजित पतीने तरुणीला तिची रूम दाखव असे म्हणून तिच्या रूमवर जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तरुणीला शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली. ही घटना १७ एप्रिल रोजी रात्री धावडे वस्ती, भोसरी येथे घडली.

भैराम अच्छीलाल बेडिया (वय ३३, रा. गुळवेवस्ती, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे लग्न ठरले होते. दरम्यान फिर्यादी आणि आरोपी बाहेर फिरायला गेले. फिरून आल्यावर आरोपीने तरुणीची रूम बघायची असल्याचे सांगून तो तिच्या रूमवर गेला. तिथे तरुणीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने नकार दिला असता आरोपीने हाताची नस कापून घेतो अशी धमकी देऊन फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीने आरोपीला लग्न कर असे म्हटले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून पाहून घेतो अशी धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.