नियोजनबद्ध पद्धतीत नाले सफाई करा- शत्रुघ्न काटे

0
81

नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी पालिका अधिकारी यांच्यासोबत प्रभागात सुरू असलेल्या पावसाळापूर्वी नाले सफाई तसेच स्टॉर्म वॉटर लाईन साफसफाई अभियानाची पाहणी केली. पावसाळा काही दिवसावरच सुरु होण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे.त्यामुळे या दिवसात चेम्बर्स , ड्रेनेज लाईन, स्टोर्म वॉटर लाईन तसेच नाले तुंबण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात व नागरिकांना त्याचा फार त्रास होतो .

त्यामुळे शत्रुघ्न (बापु) काटे यांनी सतत पाठपुरावा करत पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुर्व तयारी तसेच खबरदारी म्हणून परिसरातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईनची साफ सफाई कामाची सुरुवात करण्याचे सूचना आरोग्य विभाग तसेच स्थापत्य विभागाला दिले होते . याची अंमलबजावणी करत आरोग्य विभाग मार्फत संपूर्ण रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभागातील नाले,स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन साफसफाई कामाची सुरुवात करण्यात आली आहे .

या “नाला साफसफाई ” अभियानामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर गटारी तसेच नाले तुंबणार नाहीत.स्टॉर्म वाटर लाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल जेणेकरून रस्त्यावर पावसाचे पाणी कुठेही साचणार व तुंबणार नाही आणि यामुळे नागरिकांची कोणत्याहि प्रकारची गैरसोय होणार नाही तसेच आरोग्य विषयक समस्याही उद्भवणार नाही.

नाल्यातील घाण काढून नाले व्यवस्थित वाहतील याची व्यवस्था करण्यात येत आहे. नियोजनबद्ध पद्धतीत नाले सफाई केल्यामुळे मुसळधार पावसामुळे होणारे अनुचित प्रकार टाळता येईल. जर शहरात तुफान पाऊस झाला तर त्यामुळे नाल्यात, शहरात सखल भागात पाणी तुंबण्याची प्रकार घडू नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आरोग्य विभागाला तसेच स्थापत्य विभागाला दिले आणि हे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे हि सांगितले आहे.