नियम बाह्य वाहनांची डिलरशीप देऊन व्यावसायीकाची 29 लाख रुपयांची फसवणूक

0
277

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – स्लो स्पीडची वाहने आहेत त्यांना आरटीओ रजीस्ट्रेशन लागत नाही सांगून हाय स्पीड वाहनांची डिलरशीप देत एका व्यावसायीकाची 29 लाख रुपयांची फसवणूक कऱण्यात आली आहे. ही फसवणूक सप्टेंबर 2021 ते आज अखेर चिंचवड येथे घडला.

पोलिसांनी नियम बाह्य वाहने विकत असल्या बाबत फिर्यादी योगेश सुरेश सेठिया (वय 50 रा.चिंचवडगाव) यांना समन्स बजावली असता सेठिया यांनी या फसवणूकीबाबात चिंचवड पोलिसांकडे तक्रार दिली. यावरून मे. ग्रीन फ्युअल अल्टरनेटीव्ह (पत्ता एंडरवणे, पुणे) व व्यंकटेश तेजा, श्रेयल ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पोलिसांनी नियमबाह्ये वाहने विकत असल्याबाबत समन्स बजावली असता फिर्यादी यांनी ही तक्रार दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की आरोपींनी संबंधीत वाहने ही स्लो स्पीड वाहने आहेत यांना आरटीओ नोंदणी लागत नाही. असा विश्वास संपादन करून आरोपींनी फिर्यादीला डिलरशीप घेण्यास भाग पाडले. मात्र त्या दुचाकी व तीन चाकी वाहने ही हाय स्पीड वाहने आहेत हे लक्षात येताच फिर्यादी यांनी आरोपींना संबंधीत वाहने परत घेऊन त्यांची गुंतवलेली रक्क्म परत मागितली असता नकार देत फिर्यादी यांची 29 लाख 69 हजार 224 रुपयांची फसवणूक केली. याचा पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.