निपाहच्या संसर्गामुळे दोन संशयित मृत्यू…!

0
318

तिरुअनंतपुरम, दि.१४(पीसीबी) – भारतासह संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने मागच्या 2 वर्षांपूर्वी हादरवले होते. भारतात कोरोना व्हायरसमुळे लाखोच्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतासह संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने मागच्या २ वर्षांपूर्वी हादरवले होते. भारतात कोरोना व्हायरसमुळे लाखोच्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. कोझिकोड जिल्ह्यात निपाहच्या संसर्गामुळे दोन संशयित मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. निपाह विषाणूचा धोका लक्षात घेता, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

WHO च्या म्हणण्यानुसार, निपाह व्हायरसचा संसर्ग प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो आणि दूषित अन्नाद्वारे किंवा थेट एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. निपाह व्हायरसची लागण झालेले लोकांना श्वसनाचे आजार आणि घातक एन्सेफलायटीस यासह विविध प्रकारचे रोग पसरवू शकतात. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी निपाह विषाणूसंदर्भात केलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात १० राज्यांत हा व्हायरस पसरत आहे.

केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात दोन जणांच्या अनैसर्गिक मृत्यूनं खळबळ उडाली आहे. निपाह व्हायरसमुळं हे मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याची पुष्टी केली आहे. पुण्याच्या नॅशनल व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट येथे झालेल्या चाचणीत या दोघांना निपाह व्हायरसचा संसर्ग झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

निपाह व्हायरस हा एक नवीन विषाणू आहे जो प्राण्यांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. मलेशियामध्ये १९९९ मध्ये त्याची पहिली केस आढळून आली होती. यानंतर सिंगापूर आणि बांगलादेशमध्येही या विषाणूची प्रकरणे नोंदवण्यात आली. हा विषाणू वटवाघुळ आणि डुकरांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरतो. केरळ सरकारने कोझिकोडे येथील सात ग्रामपंचायती मध्ये कंट्रोल झोन जाहीर केले आहेत. तसेच कोझिकोडे जिल्ह्यात शाळा, कॉलेज, कार्यालये बंद ठेवण्याचे सुचनावजा आदेश देण्यात आले आहेत. कन्नूर, वायनाड व मलपपुरम जिल्ह्यात केरळ आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.