निघोजे गावात पकडली १२६० लिटर गावठी दारू

0
118

महाळुंगे, दि.1 (पीसीबी)
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निघोजे गावात पोलिसांनी १२६० लिटर गावठी दारू पकडली. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) रात्री करण्यात आली.

सोमनाथ बंडू थोटे (वय २४, रा. चिखली), बाळू पवार (रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ थोटे याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मंगेश कदम यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निघोजे गावात तळवडे ब्रिज येथे महाळुंगे पोलिसांनी एक टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये १२६० लिटर गावठी दारू आढळून आली. पोलिसांनी एक लाख २६ हजार रपये किमतीची दारू आणि पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करत सोमनाथ याला अटक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.