निगडी येथे “इंसिग्नीया” क्रीडा महोत्सवाला सूरूवात..

0
239

– एएसएमच्या आयबीएमआर कॉलेज व पिंपरी चिंचवड मनपा, स्मार्ट सिटीच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन

पिंपरी, दि. १ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने एएसएमच्या ग्रूप ऑफ इन्स्टीट्युट च्यावतीने “इंसिग्नीया” क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ३० रोजी मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी येथे आंतर-महाविद्यालयीन भव्य अशा क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. आंतर महाविद्यालयीन नॉकआऊट क्रिकेट स्पर्धेत विविध महाविद्यालयातील १९ संघांनी सहभाग नोंदविला.

यावेळी, महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक रंगराव कारंडे, एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, एएसएम आयबीएमआर-पीजीडीएमचे संचालक डॉ. संदीप साने, संचालक (संशोधन)- प्रा. डॉ. सतीश पवार, प्रा. डॉ. भाग्यश्री कुंटे यांच्यासह स्मार्ट सिटीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्पर्धाची सुरुवात खेळपट्टी पुजनाने झाली. क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी मन आणि शरीरासाठी नियमित शारीरिक हालचालींचे महत्त्व सांगितले. डॉ. संदीप साने यांनी उपस्थितांना संबोधित केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार डॉ. संदीप साने, डॉ.विजय खोडे, डॉ. बोकेफोडे यांच्या हस्ते करण्यात आला.

“इंसिग्नीया” स्पर्धे दरम्यान, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टग ऑफ वॉर, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस, सांस्कृतिक कार्यक्रम, सिंग-ओ-मॅनिया (गायन स्पर्धा- सोलो आणि ड्युएट, इंग्रजी आणि हिंदी गाणी), फूटलूज (समूह नृत्य स्पर्धा), मॅड जाहिराती, स्ट्रीट प्ले (विषय: माती वाचवा, पृथ्वी वाचवा), गर्ल्स गली क्रिकेट (मुलींसाठी 7-अ-साइड गेम), रांगोळी आणि चेहरा चित्रकला स्पर्धा, बाइक रोडीओ, बाजार नामा, फॅशन शो आदी खेळ व क्रीडा प्रकार घेण्यात येणार आहेत. क्रीडा स्पर्धेचे संयोजन प्रा.रायन, प्रा. सावित्री, प्रा. सुधीर आणि क्रीडा आयोजन समितीने केले आहेत.