निगडी येथील स्थापित स्थिर सर्वेक्षण पथकाने केली २९ लाखाची रोकड जप्त

0
116

पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली २०६, पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत निवडणुक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका करणेत आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने दैंनदिन अहवाल मावळ लोकसभेचे निवडणुक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयाकडे सादर करणेत येत असुन निगडी व दापोडी या ठिकाणी (SST) स्थापित स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.

बुधवार दि.०१/०५/२०२४ रोजी सांय: ५.०२ वाजता निगडी येथील (SST) स्थापित स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहन क्रमांक MH12UV 5005 MERCEDES BENZ GLS 400 D या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये असणारी रक्कम रोख र.रु. २९लाख ५० हजार आढळुन आली, अधिक चौकशी केली असता सदर रक्कम श्री.दिपक रविंद्र वाणी यांची असल्याचे दिसुन आल्याने सदरील केलेल्या कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण व जप्ती पंचानामा तयार करण्यात आला असून संबंधितास जप्त केलेल्या रक्कमेची पोहोच देण्यात आली आहे. जप्त रक्कम व अनुषंगिक कागदपत्रे उप आयुक्त प्राप्तीकर QRT मावळ विभाग ३३ मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यांचेकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे. सदर कार्यवाहीची ESMS या आयोगाकडील आज्ञावलीमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. आणि सविस्तर अहवाल पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणेत आलेला असुन पुढील तपास चालु आहे.